Popularity
  • 2303Total visitors:
  • 4Visitors today:

MARATHI / HINDI / ENGLISH

 

प्रेम म्हणजे काय?

प्रत्येकाच्या मनात प्रेमाची एक वेगळी परिभाषा असते. प्रत्येकासाठी प्रेम ही कल्पनाच स्वर्गसुख देणारी असते. हया पानावर जी काही मते मांडली जातील ती मते, ती मांडणाÚया व्यक्तीची वैयक्तीक असतील व ती कोणासही बंधनकारक नसतील. जर हया मतांशी कोणी सहमत नसेल तर ती व्यक्ती आपले मत आणि सहमत नसण्याचे कारण आम्हांस हया पानावर असलेल्या संपर्क फॉर्मच्या मार्फत पाठवू शकते. आम्हांला तुमचे मत आणि कारण पटल्यास आम्ही आमचे मत काढून तुमचे मत हया पानावर नोंदवू (तुमच्या नावासोबत किंवा नावाशिवाय जशी आपली इच्छा असेल).
प्रेमाविषयी आपण विविध सत्रांमध्ये जाणून घेवूया.
आजच्या आपल्या सत्रात प्रेम म्हणजे काय? हे आपण जाणून घेवूया आणि चर्चा करूया.

सत्र: 1

प्रेमाची व्याख्या:

प्रेम म्हणजे एक निस्वार्थ भावना. प्रेम म्हणजे एक असा अलौकिक सहवास, आपल्या सर्वात जवळील व्यक्तीचा जो नेहमी हवा हवासा वाटतो. तो सहवास जर नसेल जर आपल्याला आपले जगणेच निरर्थक वाटते.

ती व्यक्ती जर आपल्यावर रूसली तर सारे जगचं जणू आपल्यावर रूसलेय असे आपल्याला वाटते. ती व्यक्ती जर रडत असेल तर आपल्याला ही रडायला येते. जखम त्या व्यक्तीला होते पण त्याव्यक्तीपेक्षाही जास्त वेदना आपल्याला होतात. ती व्यक्ती हसली तर आपण आपली सारी दुःख विसरून आपणही त्या व्यक्तीच्या आनंदात विरून जातो. त्या व्यक्तीला आनंदी, सुखी आणि हसती ठेवण्यासाठी आपण काहीही करू शकतो. त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी आपण आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही.
म्हणूनच,

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे जिवाला, प्रेम म्हणजे भावना, प्रेम म्हणजे आपल्या प्रियजनांसाठी आपलं आयुष्य जगणे किंवा संपवणे.

Views

  • 82This post:
  • 3113Total reads:
  • 4Reads today: